होम प्रेग्नंसी टेस्टवर फेंट लाईन म्हणजे काय?  गरोदर आहात की नाही? जाणून घ्या

होम प्रेग्नंसी टेस्टवर फेंट लाईन म्हणजे काय? गरोदर आहात की नाही? जाणून घ्या

स्त्रिया अनेकदा प्रेग्नंसी टेस्ट करण्यासाठी घरी किट वापरतात. या टेस्टदरम्यान कधी कधी दुसरी रेषा खूप फिकट रंगाची दिसते. हे पाहून महिला गर्भवती आहे की नाही याचा अंदाज लावता येत नाही
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Pregnancy Test : स्त्रिया अनेकदा प्रेग्नंसी टेस्ट करण्यासाठी घरी किट वापरतात. या टेस्टदरम्यान लाल किंवा गुलाबी रंगाच्या रेषेने प्रेग्नंसी आहे की नाही याची पुष्टी केली जाते. पण कधी कधी दुसरी रेषा खूप फिकट रंगाची दिसते. हे पाहून महिला गर्भवती आहे की नाही याचा अंदाज लावता येत नाही. सिंगल लाइन म्हणजे तुम्ही गरोदर नाही आहात. यामुळे महिला कंन्फ्यूज होतात. आज आम्ही तुम्हाला फिकट रंगाच्या रेषाचे अर्थ सांगणार आहोत.

प्रेग्नंसी किटमध्ये दोन लाईन का येतात?

प्रेग्नंट झाल्यानंतर शरीरामध्ये बीटा एचसीजी नावाचे हार्मोन लेव्हल वाढते. हे बीटा एचसीजी रक्त आणि युरीनमध्ये वाढते. बीटा एचसीजीमुळेच प्रेग्नंसी किट युज केल्यावर रिझल्ट कळतात.

प्रेग्नंसी टेस्टमध्ये फिकट कलरची लाईन कारणं काय?

- प्रेग्नंसी टेस्ट केल्यानंतर बराच कालावधीनंतर आपण किट चेक केल्यासही फेंट लाईन दिसते. असे असल्यास पुन्हा दुसऱ्या दिवशी चेक करावे.

- कधी-कधी महिला लक्षणांमुळे आपल्या पिरीअड डेटच्या आधीच प्रेग्नंसी चेक करतात. किंवा पिरीअड डेट मिस झाल्याच्या दुऱ्याच दिवशी प्रेग्नंसी टेस्ट करतात. यामुळे प्रेग्नंसी किटमध्ये फिकट लाईन येते. म्हणजेच प्रेग्नंट तर आहे पण बाळाची अजून एवढी वाढ झालेली नाही की ते हार्मोन्समुळे लाईन डार्क रंगामध्ये येईल.

- प्रेग्नंसीमध्ये बाळाची अजून वाढ झालेली नाही. म्हणजेत 5-6 आठवड्यांचे नसेल, केवळ 4 आठवड्यांचीच प्रेग्नंसी असेल तर शरीरात बीटा एचसीजी थोड्या प्रमाणातच असते. यामुळे युरीनमध्येही थोडेच असते. यामुळे प्रेग्नंसी किटमधील सी लाईन डार्क होते. परंतु, टी लाईन फेंट येते. असे झाल्यास तीन-चार दिवसांनी पुन्हा चेक करावे. यामुळे बीटा एचसीजी वाढल्याने ही लाईन डार्क होते.

- काही जण पिरीअड मिस झाल्यानंतर एक आठवड्याने ही टेस्ट करतात. तरी लाईन फेंट येते. याचे मुख्य कारण उशिरा ओव्हल्यूशन होणे. यामुळे तीन-चार दिवसांनी पुन्हा केल्यास लाईन डार्क येईल.

- प्रेग्नंसी 6-7 आठवड्यांनी चेक केले तरी लाईन फेंट येते. या प्रकारात मिस्ड अबोर्शन होते. म्हणजेच प्रेग्नंसी झाली परंतु, ते पुढे वाढू शकले नाही. ते आतमध्ये अबोर्ट झाले. परंतु, ब्लीडिंग नाही झाली. मिसकॅरेज झाल्यानंतरही ते पिशवीतच असल्याने शरीरात बीटा एचसीजीचे प्रमाण असते. यामुळेही लाईन फेंट दिसते. याबाबत आपल्याला सोनोग्राफीद्वारे समजते.

- फेंट लाईनचे प्रेग्नंसीशिवायही कारण असते. मोनोपॉझच्या दरम्यान हार्मोन्स बदलतात. यामुळेही फेंट लाईन दिसते. पण, हे खूप दुर्मिळ प्रकरणात आढळते.

- कधी कधी कॅन्सरमुळे बीटा एचसीजी हार्मोन तयार करतात. यामुळेही फेंट लाईन दिसते.

- काही महिलांना इनफर्टीलीटी ट्रीटमेंट सुरु असते. यामध्ये काही इंजेक्शन दिले जातात. यात बीटा एचसीजीचाही समावेश असतो. यादरम्यान टेस्ट केल्यास फेंट लाईन येऊ शकते.

दरम्यान, फेंट लाईन आल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सोनोग्राफी आणि ब्लड टेस्टे द्वारे यापैकी कोणता प्रकार तुमच्यात आहे हे निश्चित केले जाते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com