सेलिब्रिटी का खात असतील ओटमील, एवोकॅडो, बार्लीसारखे प्रकार? जाणून घ्या

सेलिब्रिटी का खात असतील ओटमील, एवोकॅडो, बार्लीसारखे प्रकार? जाणून घ्या

प्रत्येकाला आपल्या हेल्थची काळजी असते. त
Published by  :
shweta walge

प्रत्येकाला आपल्या हेल्थची काळजी असते. तसचं हेल्थी आणि फिट राहण्यासाठी सेलिब्रिटी अनेक पदार्थ खातात जे आपल्याला महित नाहीत किंवा आपल्या आजूबाजूच्या परीसरात मिळत नाही. तर आज आपण जाणून घेणार आहोत अश्याच काही पदार्थांबाबत.

ओट्स

ओट्स कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवते, हृदयविकाराशी लढण्यास मदत करते आणि दुपारच्या जेवणापर्यंत पोट भरून ठेवते.

एवोकॅडो

एवोकॅडोच्या १/२ कप सर्व्हिंगमध्ये तुम्हाला तुमच्या दैनंदिन फायबरच्या जवळपास २० टक्के फायबर, तसेच कोलेस्ट्रॉल-कमी करणारे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मिळतील.

अक्रोड

अक्रोड हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्चे चांगले स्रोत आहे. तुमच्यासाठी वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करणारा पदार्थ आहे.

कीवी

कीवीमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते आणि ते पोटॅशियम आणि फायबरचा चांगला स्रोत आहे.

बार्ली

बार्लीमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात, म्हणूनच त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. आयुर्वेदानुसार बार्ली आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

पीनट बटर

पीनट बटरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते, जे स्नायूंच्या जडण घडणीमध्ये आणि फ़ॅट्सच्या ग्रोथच्या अवस्थेमध्ये बरेच काम करते. एक चमचे पीनट बटरमध्ये सुमारे १०० कॅलरी असतात परंतु मोनो अनसॅचुरेटेड फ़ॅट्सच्या स्वरूपात असतात. यात सॅचुरेटेड फ़ॅट्स सुद्धा असते ज्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल पातळी आणि हृदय रोग होऊ शकतो. 

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com