World Egg Day 2023 : जाणून घ्या का साजरा केला जातो 'जागतिक अंडी दिन'

World Egg Day 2023 : जाणून घ्या का साजरा केला जातो 'जागतिक अंडी दिन'

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जगभरात 'जागतिक अंडी दिन' साजरा केला जातो, अंड्याच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.
Published by :
shweta walge
Published on

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जगभरात 'जागतिक अंडी दिन' साजरा केला जातो, अंड्याच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातोय. जगातील कोणत्याही देशात गेलात तरी तुम्हाला अंडी आणि त्यापासून बनवलेले पदार्थ नक्कीच खायला मिळतील, अगदी मांसाहारी नसलेल्या लोकांनाही अंडी खायला आवडतात.

अंड्याची वैशिष्ट्ये : नाश्त्यासाठी अंडी हा एक चांगला आहार मानला जात असला तरी, त्यापासून बनवलेले विविध प्रकारचे पदार्थ दिवसभरात कधीही खाऊ शकतात. दिल्लीचे पोषणतज्ञ डॉ. दिव्या शर्मा सांगतात की, अंड्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांचे संयोजन एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन आहारातील पौष्टिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. त्यात उच्च दर्जाची प्रथिनं, ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडस्, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन डी आणि 13 जीवनसत्त्वं आणि खनिजं चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. याशिवाय काही विशेष आणि अतिशय फायदेशीर अमीनो अ‍ॅसिडही यामध्ये आढळतात. कॅलरीजबद्दल बोलायचं झाल्यास एका अंड्यामध्ये सुमारे 80-100 कॅलरीज असू शकतात.

भारतातील १० राज्ये अंड्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास व्यवसाय मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात वर्ष २०२१-२२ मध्ये १२९.६० बिलियन नग अंड्यांचं उत्पादन झालं आहे. मंत्रालयाच्या मूलभूत पशुसंवर्धन आकडेवारी २०२२ नुसार (Basic Animal Husbandry Statistics), गेल्या वर्षीच्या तुलनेत अंड्याच्या उत्पादनात ६.१९ टक्के वाढ झाली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकासह भारतातील १० राज्यांत अंड्यांचं उत्पादन सर्वाधिक होते. देशातील अंडा उत्पादनात आंध्र प्रदेशचं योगदान २०.४१ टक्के आहे. तसेच २०२१-२२ च्या आकड्यांनुसार, देशातील एकूण अंडा उत्पादनात तामिळनाडूचा वाटा १६. ०८ टक्के आहे. तेलंगणातही अंड्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. इथे वार्षिक १२.८६ टक्के उत्पादन होते.

आंतरराष्ट्रीय अंडी आयोगानुसार, जगातील ६० टक्के अंडी चीन, युरोप, अमेरिका आणि भारतात उत्पादित केली जातात. आर्थिक सर्वेक्षण २०२१-२२ नुसार, १२५० कोटी वार्षिक क्षमतेसह जागतिक अंडी उत्पादनात भारत आता तिसर्‍या क्रमांकावर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, भारतात डझनभर अंड्यांची किंमत ०.९५ डॉलर म्हणजे ७८ रुपये आहे. त्यानुसार येथे एका अंड्याची सरासरी किंमत साडेसहा रुपये आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com