तुम्ही गोल चपाती बनवू शकत नाही! या सोप्या पद्धतीने बनवा

तुम्ही गोल चपाती बनवू शकत नाही! या सोप्या पद्धतीने बनवा

तुम्ही गोल चपाती बनवू शकत नाही. यासाठी सतत घरच्यांचे ऐकून घ्यावे लागते.
Published by  :
Siddhi Naringrekar

तुम्ही गोल चपाती बनवू शकत नाही. यासाठी सतत घरच्यांचे ऐकून घ्यावे लागते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला गोल चपाती कशी करायची हे सांगणार आहोत.

तुमची रोटी गोल होत नसेल, तर लाटलेली रोटी एका मध्यम आकाराच्या वाटीने दाबा आणि मग उरलेले पीठ वेगळे करण्यासाठी वाटीच्या बाजू सुरीने कापून घ्या. जेव्हा तुम्ही कणकेच्या वरून वाटी काढाल तेव्हा तुमची रोटी तयार होईल.

गोल शेपर्सही बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमतही फारशी नाही. एक पिठाचा गोळा रोलिंग बोर्डवर ठेवा आणि तो रोल करा आणि मग मोल्डच्या मदतीने सहजपणे गोल आकारात कापून घ्या.

गोल रोटी बनवण्यासाठी सर्वप्रथम पीठ घ्या, गोल लाडूसारखे बनवा आणि हाताने दाबा. ते काठावरुन फिरवायला सुरुवात करा आणि हळूहळू मध्यभागी वर्तुळाकार हालचाली करा. थोडं थोडं लाटताना रोटी मोठी करत राहा. जर रोटी रोलिंग पिन किंवा डिस्कला चिकटत असेल तर दोन्ही बाजूंनी पुन्हा कोरडे पीठ लावा. नंतर रोटी लाटून घ्या.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com