Covid-19 updates
बीडमध्ये 12 मेपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु काय बंद?
वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यात 12 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. तसेच या काळात दररोज सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत फेरीवाल्यांना तसेच भाजीपला विक्री करण्यास मुभा असेल.
बीड जिल्ह्यातसुद्धात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे येथील जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बीड जिल्हा प्रशासनाने येत्या 12 मे पर्यंत जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन लागू केला आहे. याकाळात नागरिकांना बाहेर पडण्यास निर्बंध असतील. तसेच, या काळात अत्यावश्यक सेवा वागळता सर्व आस्थापना या बंद ठेवण्यात येणार आहेत.