बाजारात नाही तुरी…

बाजारात नाही तुरी…

Published by :
Vikrant Shinde
Published on

नरेंद्र कोठेकर | शनिवारी दिवसभर एमआयएमच्या (mim) इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केलेल्या एकमात्र वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले… ना युतीचा ठोस प्रस्ताव, ना त्यासंदर्भातील कोणतीही बैठक… मात्र राज्यातील बहुतांश नेत्यांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देत होळीनंतरची राजकीय धुळवड साजरी करून घेतली… दिवसभरात झालेली प्रतिक्रियांची फटकेबाजी पाहता 'बाजारात नाही तुरी आणि भट भटणीला मारी' अशीच अवस्था दिसून आली… राजकारणापलिकडे एकमेकांचे मित्र असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (NCP leaders and Health Minister Rajesh Tope) इम्तियाज जलील यांच्या घरी सांत्वनपर बैठकीसाठी गेले होते… औपचारीक गप्पांमध्ये देशीतील एकूण राजकीय परिस्थितीचा विषय झाला….या चर्चेदरम्यान टोपे यांनी जलील यांना मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले… जलील यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीची(alliance to ncp) ऑफर दिली.. याची चर्चाही बैठकीबाहेर येण्याची राजकीय व्यवस्था झाली…(याचा अर्थ हे ठरवूनही असू शकतं) आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेची राळ उडाली.. प्रत्येक नेता याची कोणतीही पार्श्वभूमी लक्षात न घेता आपापल्या प्रतिक्रिया देण्यासाठी दंड थोपटून सज्ज झाला… जलील यांच्या या राजकीय ऑफरचा साधा प्रस्तावही महाविकास आघाडी सरकारकडे (Mahavikas Aghadi government) आला नव्हता.. त्याआधीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) यांनी शिवसेनेने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे( balasaheb thackerey) हे विसरून आता जनाब बाळासाहेब ठाकरे यांना स्वीकारले आहे, अशा अत्यंत बोचऱ्या शब्दात टोला लगावला. हे तिन्ही पक्ष केवळ भाजपाला हरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कोणीही कधीही एकत्र आलं तरीही भारतातील जनता, देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ही मोदींच्या पाठीशी आहे आणि ती भाजपालाच निवडून देईल. फक्त आता या संभाव्य आघाडीमध्ये शिवसेना (shivsena) काय करणार? याकडे आमचं लक्ष असेल. असंही म्हणत फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलंय… मात्र यासर्व प्रकरणात शिवसेना काय करणार? हेच आता आम्हाला पाहायचे आहे. हे हरले तर यांना ईव्हीएम (evm) दिसते, बी टीम, सी टीम, झेड टीम दिसून येते, हरल्यानंतर या पद्धतीच्या टीका करत असतात. आता शिवसेना सत्तेसाठी काय करते, हे आम्हाला पाहायचे आहे, असे सांगत फडणवीसांनी शिवसेनेला लक्ष्य करणारी प्रतिक्रिया दिलीय.. यावर शिवसेनेचे संजय राऊत (sanjay raut) यांनी जलील यांचा प्रस्ताव (जो वास्तवात नव्हताच) पुरता फेटाळून लावला… राज्यात तीन पक्षांचेच मविआ सरकार आहे आणि तेच कायम राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडला? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब (Aurangzeb) त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी जलील यांना खडे बोल सुनावले… त्यावर जलील यांनीही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज तुम्हा कोणाची मक्तेदारी नसल्याचा प्रतिदावा केला… राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी समविचारी पक्ष समाजाच्या विकासाच्या मुद्यावर एकत्र येणार असतील तर स्वागतच असल्याचे सांगत जलील यांच्या कथित प्रस्तावाला समर्थन दिले.. तर त्यांच्याच पक्षाचे जयतं पाटील यांनी एमआयएम (mim) हा पक्ष भाजपा पुरस्कृत असून निवडणुकीत ते भाजपाची बी टिम म्हणून काम करत असल्याचा आरोप केला.. त्यांनी आधी ते भाजपाची बी टीम नाहीत हे सिद्ध करून दाखवावं असं थेट आव्हान पाटील यांनी दिलं… काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत अद्याप आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगत यावरील भूमिका स्पष्ट करण्याचे टाळले… तर काँग्रेसच्याच मुख्य प्रवक्ते लोंढे (atul londhe) यांनी जलीलांनी आधी स्वतः भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे आणि मगच युती आणि आघाडीच्या बाबत चर्चा केल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया दिली… एमआयएम हा एका विचारधारेशी संबंधित पक्ष आहे… ते अल्पसंख्यांक विचारांशी बांधिल असले तरी त्यांचे विचार टोकाचे आहेत. जसे भाजपाचे विचार हिंदुत्वाबाबत कट्टर आहेत… त्यामुळे मविआ सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष यावर सहमत झाले तरी खरी अडचण शिवसेनेची होणार आहे… कारण दोन्ही पक्ष किमान निवडणुकीपुरती का होईना पण अल्पसंख्यांकांसोबत करण्यास तयार असतात… मात्र, शिवसेनेने सुरूवातीपासूनच मुस्लिम समाजाबाबतची भूमिका नेहमी विरोधी ठेवलीय… जलील यांनी त्यांच्या पक्षाचा प्रस्ताव राष्ट्रवादीला दिला असता तरी भविष्यात हा मुद्दा जर प्रत्यक्षात आला तर अडचण शिवसेनेचीच होणार आहे… 'भाजपाच्या बंद दारा आड चर्चेच्या' नाट्यानंतर शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत आघाडी करून सरकार बनवले… याआधी मतांच्या राजकारणासाठी शिवेसनेने उत्तरभारतीय मतांचा जोगवा मिळवण्यासाठी 'मी मुंबईकर' मोहिमही उघडली होती… मागील विधानसभा निवडणुकीतही वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे 'केम छो' बॅनर्समोहिम गाजली होती… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या इंदिरा गांधीना आपले समर्थन दिले होते.. तर त्यानंतर पालिका निवडणुकीत महापौरांच्या निवडीसाठी त्यांनी मुस्लिम लिगचा पाठिंबा घेतला होता… राजकारणात कोणताही पक्ष आणि कोणतेही विचार कधीच अस्पृश्य राहिलेले नाहीत… एका विचारधारेच्या पक्षाने मतांसाठी वा सत्तेसाठी दुसऱ्या विचारांच्या पक्षाशी आणि नेत्यांशी नेहमीच हातमिळवणी केली आहे.. त्यामुळे राजकारणात कधी-काय होईल याबाबत ठाम राहता येणार नाही.. युध्दात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं असं साहित्यिक-कवी सांगत असत… पण अलिकडे राजकारणातही सर्व काही क्षम्य असतं अशीच परिस्थिती आहे.. भविष्यात एमआयएम कोणासोबत जाईल किंवा कोणाला आघाडीचा प्रस्ताव देईल याबाबत आत्ता सांगता येणार नाही.. मात्र, जलील यांच्या वक्तव्यावरून राजकारणात प्रत्यक्षात काही ठोस घडलं नसलं तरी राजकीय धुरळा राज्यभरात लय भारी उडाला…

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com