गोवा टू महाराष्ट्र… व्हाया मुंबई

गोवा टू महाराष्ट्र… व्हाया मुंबई

Published by :
Shweta Chavan-Zagade

पाच राज्यातील निवडणुकीत (five state elections ) भाजपाला (bjp) पंजाब वगळता चार राज्यात मिळालेल्या यशानंतर आगामी 2024 च्या लोकसभा (loksabha) निवडणुकीची गणिते जुळवण्यास भाजपाच्या वरिष्ठांनी सुरूवात केली आहे… या विजयानंतर भाजपाने आता पुढील रणनितीची सुरूवात केलीय.. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांचा गेल्या दोन दिवसांतील गुजरात दौरा त्याचाच भाग आहे… यावर्षी गुजरात विधानसभेच्या निवडणुका होत आहे.. मागील दिल्ली विधानसभा आणि आता पंजाबमधील आम आदमी पार्टीचा (aap) विजय पाहता भाजपाला 'आप' चा धोका वाढतोय… दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejariwal) यांनी आगामी गुजरात विधानसभा (gujarat election) निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर 'आप'कडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जातील, गुजरातमधील सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस विरुद्ध एक विश्वासार्ह पर्याय म्हणून 'आप' समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय…

मागील निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या विजयाची लाट असताना देखील गुजरातमध्ये काँग्रेसने (cong-bjp) भाजपला घाम फोडला होता…आता जसा भाजपाचा आत्मविश्वास बळावलाय तसाच तो आपच्या नेत्यांचाही बळावलाय… त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाला काँग्रेसपेक्षा 'आप'चा धोका वाढलाय… भाजपासाठी गोव्याची (goa) निवडणूकही प्रतिष्ठेची होती.. त्यात भाजपाने यश मिळवले.. आता भाजपाने 'लक्ष्य महाराष्ट्र' (maharashtra) ठरवलं आहे… त्याची सुरूवात ते मुंबई-ठाणे महापालिकेच्या निवडणुकीपासून करणार आहेत.. गेल्या तीन दशकांपासून मुंबई महापालिकेवर (bmc) शिवसेनेची सत्ता आहे… त्याला सुरूंग लावण्याचा पक्का इरादा भाजपा नेत्यांनी केलाय… पालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढत त्यांनी 84 नगरसेवक निवडून आणले होते… हा शिवसेनेसाठी धक्का होता… भाजपाचे पालिकेतील वाढलेले प्राबल्य आता यावेळी शिवसेनेसाठी मोठी डोकेदुःखी ठरणार यात शंका नाही…

सध्या मुंबईत भाजपाचे 16 आमदार (mla) आणि 3 खासदार (mp) आहेत.. त्याच्या मदतीनं आता महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचा भाजपाची तयारी आहे.. त्यासाठी भाजपाने 36 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदारसंघातील भाजपा वॉर्ड(ward) अध्यक्षांची याआधीच पुनर्रचना केलीय… आगामी पालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपाचाच महापोर असेल असा ठाम विश्वास भाजपाच्या नेत्यांनी केलाय… देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोव्याची जबाबदारी दिली होती… त्यांनी तेथे मनोहर पर्रिकर (manohar parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनाही त्यांना हवं असलेल्या मतदारसंघात तिकीट न देण्याची जोखीम घेतली.. गोव्याच्या रणनितीत फडणवीस यशस्वी झाल्याने आता मुंबई महापालिका आणि नंतरच्या महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपा सज्ज असल्याचा दावा फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सर्वच नेत्यांनी केलाय… भाजपाच्या रणनितीचा विचार केल्यास भाजपा पालिका निवडणुकीत सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ओढून आणेल… त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेला आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे…

पालिकेत मविआच्या सहयोगी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवावी लागेल किंवा स्वतंत्र लढताना त्यांना त्यांच्या आत्ताच्या जागांपेक्षा अधिक जागा आणाव्या लागतील.. पालिकेत अन्य दोन पक्षांशी आघाडी केल्यास साहजिकच शिवसेनेच्या जागा कमी होतील… त्यामुळे कोणताही निर्णय झाल्यास त्याचा फटका शिवसेनेला बसणार असून दोन्ही बाजुनं भाजपा विजयाकडे वाटचाल करण्याच्या तयारीत आहे… राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाचा आत्ता मिळालेला विजय हा त्यांना 2024 मध्ये लागू होणार नाही… ती लढाई खरी लढाई असेल… असे सांगत भाजपाचे लोकसभेचे मताधिक्य घटेल असा अंदाज व्यक्त केलाय… मात्र, भाजपाची रणनिती आणि भाजपाचे मागील निवडणुकांमधील राज्यातील यश पाहता त्यांना महाराष्ट्रात स्वतःची सत्ता आणणे तेव्हढे कठीण राहिलेले नाही.. त्यासाठी भाजपा राजकारणातील सर्व आयुधांचा वापर करील…

गेल्या सव्वा दोन वर्षांपूर्वी मविआ सरकारची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं सर्वेतोपरी प्रयत्न केले आहेत.. त्यामुळे 2024 साठी भाजपा कंबर कसणार यात शंका नाही… भाजपाचा महाराष्ट्रातील सत्तेचा मार्ग हा मुंबई महापालिकेच्या सत्तेतून जातोय… त्यांनी गोव्यात सत्ता मिळवलीय.. आता त्यांचे 'मिशन मुंबई' असून त्यानंतर त्यांना महाराष्ट्रात सत्ता मिळवणे सोपे जाणार आहे.. मागील निवडणुकीत भाजपाने अन्य पक्षातील अनेक आयारामांसाठी पक्षाची दारे उघडी केली होती… आता 2024 ला त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही…

                                                                                  – नरेंद्र कोठेकर, कार्यकारी संपादक, लोकशाही न्यूज

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com