Balasaheb Thackeray
Balasaheb ThackerayTeam Lokshahi

हिंदूहदयसम्राट 'बाळासाहेब ठाकरे' यांचा 10 वा स्मृती दिन

मराठी अस्मितेचे मानबिंदु आणि शिवसेना संस्थापक 'बाळासाहेब ठाकरे' यांना 10 व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Published by :
Team Lokshahi

अंकिता शिंदे

मराठी अस्मितेचे मानबिंदु व शिवसेना संस्थापक 'बाळासाहेब केशव ठाकरे' यांचा आज 10 वा स्मृती दिन आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक व्यंगचित्रकार होते व सामना या वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक आणि एक राजकिय नेते होते. बाळासाहेब ठाकरे आपल्या व्यंगचित्रातून राजकीय- सामाजिक प्रश्नांवर भाष्य करायचे. इ.स. 1950 मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार 'आर.के. लक्ष्मण' यांच्या सहवासात काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे व जाहिरातींचे डिझाइन काढत असे. नंतर काही कारणास्तव त्यांनी नोकरी सोडून इ. स.1950-1960 म्धये मार्मिक हे व्यंगचित्रात्मक साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाचे मार्मिक हे नाव त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचवलेलं आहे. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले.

‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या साप्ताहिकाचे 1950 ते 1960 पर्यंतचा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढयातही समावेश आहे त्या काळी प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होत होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांवर बाळासाहेबांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करण्यात ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत होते.

BalaSaheb Thackeray
BalaSaheb ThackerayTeam Lokshahi

1966 साली बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या मते 'समाजसुधारकांची समृद्धी, परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागे राहिला आहे, महाराष्ट्रात सुविधा आहेत पण मराठी माणूस दुविधेत आहेत, आपल्याकडे उद्योग आहे पण मराठी तरूण बेरोजगार आहे, पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. देशात महाराष्ट्राला मान आहे. परंतू, महाराष्ट्रातल्याच मुंबईत मराठी माणूस अपमानित होतो आहे म्हणून साहेबांनी शिवसेना स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेचा पहिला मेळावा दादर येथील शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यात लाखो लोकं जमली होती. या नंतर बाळासाहेब आणि शिवसेनेकडे लोक त्यांच्या समस्या सोडवणार्‍या आशेने पाहू लागले आणि हळू-हळू बाळासाहेब आणि शिवाजी पार्क हे मराठी माणसामधील दुवा बनले. ‘मार्मिक’मध्ये शिवसेनेच्या स्थापनेची बीजे दिसून येतात.

1955-1999 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. शिवसेनेने राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केले आणि म्हणूनच मराठी माणूस हा बाळासाहेबांमुळे त्यांच्या समाजाप्रती असलेल्या प्रेमामुळे शिवसेनेशी जोडला गेला.

Balasaheb Thackeray
Rahul Gandhi : राहुल गांधींना या मोठ्या नेत्याचा मिळाला पाठिंबा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com