शुभमनच्या कमबॅकचे रहस्य काय, अर्थातच सारा सचिन तेंडुलकर

शुभमनच्या कमबॅकचे रहस्य काय, अर्थातच सारा सचिन तेंडुलकर

तब्बल 27 वर्षांनी पुण्यात विश्वकरंडक क्रिकेटचा कुंभमेळ्या रंगला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय दुधाणे

तब्बल 27 वर्षांनी पुण्यात विश्वकरंडक क्रिकेटचा कुंभमेळा रंगला. सार्‍या जगाच्या क्रिकेट शौकिनांच्या नजरा पुण्याकडे वळल्या होत्या. चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद गाजविल्यानंतर आता पुणे जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला होता. समोर आव्हान होते बांग्लादेशाचं. ऑक्टोबर हिटचे चटके बसत असताना स्टेडियममध्ये निळे वादळ उसळले. 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानात पहिली इनिंग गाजवली ती शुभमन गील, विराट कोहलीने. हार्दिक पांड्या जखमी झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला.

बांग्लादेशाचा आघाडीवीर लिटन दासला पुणे मैदान लकी ठरले. 66 धावांची खेळी करणार्‍या दासने नवव्या षटकात मारलेला फटका पायाने अडविला. तेथेच घात झाला. पुढचा चेंडू टाकताना दुखावलेला पाया मुरगळला आणि हादिर्र्क जमीनीवर कोसळला. त्याला उभे रहाताच येत नव्हते. कसा बसा पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारतासाठी हा मोठा धक्का होता. सुरूवातीला ती जखम किरकोळ भासली. तासभरातच हार्दिकाला चिंचवडमधील बिर्ला हॉस्पीटलमध्ये चाचणीसाठी दाखल करण्यात आले. देशाच्या मधल्या फलदांजीचा कणा असणारा हार्दिक पुढील सामने खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

हार्दिक तंबूत परतला तेव्हा त्याचे राहिलेले तीन चेंडूसाठी कर्णधार रोहित शर्माला तात्पुरता गोलंदाज शोधण्यची वेळ आली. तेव्हा विराटच्या हातात चेंडू देण्यात आला. तोच मैदान विराट-विराट जयघोषाने दुमदुमले. तब्बल 6 वर्षांनी गोलदांजी करणारा विराट अवरतला होता. 3 चेंडूची बेबी ओव्हर विराटने टाकून 2 धावा दिल्या. पुणेकरांना विराटची फलदांजी आणि गोलदांजी पाहण्याची पर्वणी लाभली.

मेरी भाभी कैसे हो, सारा भाभी जैसी हो

उन्हाळा तडाखा असल्याने पहिले पंधरा षटके गॅलरी रिकामीच होती. जय शिवाजी, जय भवनीचा जल्लोष मराठमोळे शौकिन करीत असताना साऊथ स्टँडकडे शुभमन गील शांतपणे सीमा रेषे जवळ उभा होता. तोच गॅलरीतून मेरी भाभी कैसे हो, सारा भाभी जैसी हो असा नारा घुमला. सोशल मिडिया सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि शुभमन गीलच्या यांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे. यामुळेच मेरी भाभी कैसे हो, सारा भाभी जैसी हो असा नारा होताच शुभमननेही मागे वळून हात उंच करून अभिवादन करीत शौकिनांची मने जिंकली.

पुणयातील मैदानात सारा सचिन तेंडुलकरची उपस्थिती लक्षणीय होती. धोकादायक लिटन दासला झेल घेतल्यानंतर साराने टाळ्या वाजवून आनंदही साजरा केला. डेंगू झाल्यामुळे चेन्नई, दिल्लीत शुभमन संघाबाहेर होता. अहमदाबादमध्ये तो दुहेरी धावसंख्याही करू शकला नाही, मात्र पुण्यात दमदार खेळी करणार्‍या शुभमनच्या प्रत्येक फटकाचे सारा कौतुक करीत होती. पुण्याच्या लढतीत खेळाडू नाही तर सारा ट्रेडिंग झाली. साराचा पायगुण असल्यामुळेच की आहे शुभमन सूर गवसला होता. अर्धशतक झळकवल्यानंतर साराने उभे राहून शुभमने अभिनंदन केले. त्यामुळे शुभमन-साराची स्टेारी अधिकच ट्रोल झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com