Bhiwandi Crime : भिवंडीत 'दृश्यम'चा रिप्ले, आधी मारलं मग शरिराचे तुकडे दुकानात गाडले

Bhiwandi Crime : भिवंडीत 'दृश्यम'चा रिप्ले, आधी मारलं मग शरिराचे तुकडे दुकानात गाडले

भिवंडी क्राइम: भिवंडीत 'दृश्यम'चा रिप्ले, हत्या करून मृतदेहाचे तुकडे दुकानात गाडले, पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Published by :
Prachi Nate
Published on

भिवंडी शहरातील नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे काही अवशेष दुकानात गाडून ठेवणाऱ्या हत्या करणाऱ्यास ठाणे गुन्हा शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक करीत घटनास्थळा वरून गाडून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केले आहेत.

गुलाम रब्बानी असे अटक केलेल्या मौलवीचे नाव असून शोएब शेख वय 17 असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील 17 वर्षीय शोएब शेख 20 नोव्हेंबर 2020 रोजी बेपत्ता झाला होता. पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार परिसरात राहणारा मदरशाचा मौलवी गुलाम रब्बानी याने शोएब शेख याची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. 2023 मध्ये चौकशी दरम्यान बोलवण्यात आलेला मौलाना गर्दीचा फायदा घेत फरार झाला होता.

त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाने मौलानाची कसून चौकशी केली त्यावेळी त्याने शोएब शेखची हत्या केल्याचे कबूल केले. त्याने त्याची नुसती हत्या केली नाही, तर त्याच्या शरीराचे काही तुकडे आणि शिर दुकानात गाडून ठेवला असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आरोपीस घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ताब्यात देण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com