Haryana Crime News : हरियाणामध्ये किरकोळ वादातून राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टरची गोळ्या घालून हत्या

Haryana Crime News : हरियाणामध्ये किरकोळ वादातून राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टरची गोळ्या घालून हत्या

हरियाणातील सोनीपत येथे पार्क केलेल्या मोटारसायकलच्या वादातून राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टरची गोळ्या घालून हत्या. आरोपीने मद्यधुंद अवस्थेत केलेल्या गोळीबारामुळे २० वर्षीय पॉवरलिफ्टरचा मृत्यू.
Published by :
Team Lokshahi
Published on

हरियाणातील सोनीपत येथे रविवारी धक्कादायक घटना घडली. प्रगती नगरमधील लेनमध्ये पार्क केलेल्या मोटारसायकलच्या वादातून एका मद्यधुंद व्यक्तीने २० वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टरवर गोळीबार आला आहे. हा पॉवरलिफ्टर जिल्हास्तरीय सुर्वणपदक विजेता आणि राष्ट्रीय रौप्यपदक विजेता आहे. ही घटना सुमारास घडली होती.

नेमकं काय झालं?

पॉवरलिफ्टर वंश यांच्या वर्गमैत्रिणी अक्षिता आणि वंशिका याच्यांकडे चार्जर घेण्यासाठी दुपारी ३ च्या सुमारास प्रगती नगर येथे आला. त्याने मोटारसायकल लेनच्या कोपऱ्यावर लावली होती. काही वेळाने आरोपी कुलदीप हा त्याच्या कारमधून आला, मोटारसायकल रस्ता अडवत असल्याने आरोपीने हॉर्न वाजवला. वंश खाली येताच त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. या वादामध्ये अक्षिता आणि वंशिका पडल्याने, आरोपीने त्या दोघींना मारहाण करण्यास सुरुवात केली. वंशने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. या रागामध्ये आरोपीने कारमधून पिस्तूल काढली आणि वंशवर गोळ्या झाडल्या. वंशच्या पोटात, छातीत, तोंडात आणि पाठीत गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com