Kanjurmarg Crime
KANJURMARG YOUTH MURDER: 23-YEAR-OLD STABBED TO DEATH, ACCUSED ARRESTED

Kanjurmarg Crime: कांजूरमार्गमध्ये तरुणावर चाकूहल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

Mumbai Crime: कांजूरमार्गमध्ये २३ वर्षीय हर्ष ठाकूर याच्यावर पहाटे धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राजेश गुप्ता | लोकशाही मराठी न्यूज

कांजूरमार्ग, कांजूरमार्ग परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कांजूरमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत २३ वर्षीय तरुणावर ओळखीच्या व्यक्तीने धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हर्ष ठाकूर असे मृत तरुणाचे नाव आहे.

Kanjurmarg Crime
Mulund Bridge Accident: बेपर्वा ब्रिजकामाचा कहर! लोखंडी पिलर कोसळून कारचे नुकसान

याप्रकरणी हर्षचे वडील तुषार ठाकूर (वय ४५) यांनी येथे तक्रार दाखल केली आहे. तुषार ठाकूर हे व्यवसायाने चालक असून ते कांजूरमार्ग परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी पहाटे ते घरी झोपेत असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने त्यांच्या मुलाला कोणीतरी अनेक वेळा धारदार शस्त्राने भोसकले असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली.

Kanjurmarg Crime
Mulund Hospital: अग्रवाल रुग्णालयात राष्ट्रपुरुषांची तैलचित्रे लावण्याची मागणी; रुग्णांच्या गैरसोयींकडे लक्ष देण्याचे आवाहन

पोलिस तपासानुसार, ही घटना शनिवारी पहाटे सुमारे १.१५ ते १.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. हर्ष ठाकूर हा आपल्या काही मित्रांसोबत परिसरात उभा असताना आरोपी रोहित खरात हा दुचाकीवरून तेथे आला. त्याने हर्षला बाजूला बोलण्यासाठी जवळ बोलावले. काही क्षणातच त्याने अचानक धारदार शस्त्र बाहेर काढून हर्षवर वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हर्ष गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरावर अनेक वार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हल्ला होत असताना हर्षचे मित्र त्याच्या मदतीला धावून आले. मात्र आरोपीने त्यांनाही चाकूसारख्या वस्तूचा धाक दाखवत धमकावले. त्यामुळे घाबरलेले मित्र काही क्षण मागे सरकले. याच संधीचा फायदा घेत आरोपी रोहित खरात दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला.

जखमी हर्षला मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले; मात्र जखमा गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हर्षच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेनंतर कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीद्वारे आरोपीचा माग काढण्यात आला. अखेर पोलिसांनी जालना येथे सापळा रचून आरोपी रोहित खरात याला अटक केली. आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. पोलिस अधिक तपास करून हल्ल्यामागील नेमके कारण आणि पार्श्वभूमी उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Summary
  • कांजूरमार्गमध्ये २३ वर्षीय हर्ष ठाकूर याच्यावर चाकूहल्ला.

  • गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान मृत्यू.

  • आरोपी रोहित खरात घटनास्थळावरून फरार झाला होता.

  • पोलिसांनी जालना येथे सापळा रचून आरोपीला अटक केली; पुढील तपास सुरू.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com