Satara : कराड हादरलं! 5 वर्षीय चिमुरडीची गळा चिरून हत्या

कराड हादरलं! 5 वर्षीय चिमुरडीची गळा चिरून हत्या, पोलिस तपासात ऊसतोड कामगार संशयित
Published by :
Team Lokshahi

कराडच्या वाठार गावात चिमुरडीची गळाचिरूण निर्घूणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. सायंकाळी घराबाहेर खेळायला गेलेली चिमुरडी घरी न परतल्यानं रात्रभर तिचा शोध घेण्यात आला होता. मात्र तिचा मृतदेहच सापडला. तिच्या गळ्यावर चाकूचे वार आणि डोकं दगडानं ठेचल्याचा समोर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संस्कृती रामचंद्र जाधव वय वर्ष 5 असं मृत मुलीचं नाव आहे. संशयित ऊसतोड कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com