Pune Accident : कात्रजमध्ये भीषण अपघात; भरधाव येणाऱ्या व्हॅगनार कारची 21 वर्षीय तरुणीला धडक

Pune Accident : कात्रजमध्ये भीषण अपघात; भरधाव येणाऱ्या व्हॅगनार कारची 21 वर्षीय तरुणीला धडक

पुण्यातील कात्रजमध्ये 21 वर्षीय तरुणीला भरधाव टुरिस्ट व्हॅनने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुण्यातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकताच गंगाधाम चौकात एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला होता, आणि त्यानंतर लगेचच कात्रजच्या सुखसागर नगर परिसरात आणखी एक दुर्दैवी घटना घडली. यशश्री सोसायटी समोर रस्त्यावरून चालत असलेल्या श्रेया गौतम येवले (वय 21, रा. शीतल हाईट्स, खंडोबा मंदिरजवळ, कोंढवा) हिला भरधाव टुरिस्ट व्हॅनने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

ही दुर्घटना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. एमएच 12 यु एम 4847 क्रमांकाची कार मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर शिरली व नारळाचे झाड उडवत थेट श्रेयावर आदळली. गाडीची धडक इतकी जोरदार होती की, समोर असलेले बदामाचे झाड आणि कार यामध्ये अडकून ती जागीच ठार झाली. अपघाताचा आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी धावले.

अपघाताची माहिती मिळताच कोंढवा, बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांतील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी कारचालक सतीश गुरुनाथ होनमाने (वय 37, रा. गोकुळनगर) याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

सतीश होनमाने हे त्यांच्या नातेवाईक दत्तात्रेय गाडेकर (वय 45) यांना कार चालवायला शिकवत होते, त्याच वेळी ही घटना घडली. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला असून अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. नागरी वसाहतीत भरधाव वाहनं आणि अवजड गाड्यांच्या हालचालींमुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com