Borivali Crime News : दारूच्या नशेत मारहाण,शिवीगाळ; नंतर थेट महिलेचं घर जाळलं, गोराईतील घटना
बोरिवली येथे धक्कादायक घटना घडली आहे. आधी दारुच्या नशेत शिवीगाळ आणि महिलेला केली त्यानंतर थेट महिलेचं घर पेटवलं. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेतील गोराई भागात एका व्यक्तीने एका महिलेला मारहाण करत तिचं घर पेटवलं आहे, ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे अशी पोलिसांची माहिती आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपीवर 79, 351(2), 115(2), 326(G), 131 BNS या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करुन न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय घडलं ?
महिला घरात गरम होत असल्यामुळे बाहेर बसली होती. त्यावेळा तो व्यक्ती हातात मद्यपान घेऊन तिच्या घरासमोर आला. त्यानंतर तो व्यक्ती तिथे दारुच्या नशेत तिथे शिवीगाळ करायला लागला. त्यानंतर तेथील स्थानिक लोकं शांत राहिले मात्र, नंतर तो व्यक्ती तेथील लोकांना आणि त्या महिलेला मारहाण करु लागला. तसेच त्या महिलेच्या मुलाच्या डोक्यावर त्याने मद्यपानाची बॉटल फोडली. त्यानंतर त्या हातात दगड घेतला आणि त्यांच्या मागे धावला आणि भीतीने ते ती महिला आणि तिचा मुलगा तसेच आसपासची लोक तिथून पळून गेले. ती महिला तिच्या मुलासोबत घरात गेली. त्यानंतर महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेली असता त्या व्यक्तीने तिचे घर पेट्रोल टाकून पेटवले असल्याची माहिती त्या महिलेने दिली आहे.