Bangalore Crime : "...म्हणून मी तिला मारलं" सनकी पतीने पत्नीचा केला खून, आरोपीने स्वतः दिली खूनाची माहिती
पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाला कंटाळून पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. आरोपी पतीला पोलीसांनी अटक केली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बंगलोरमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय राकेश आणि 32 वर्षीय गौरी यांच्या लग्नाला दोन वर्ष झाले होते. दोघेही एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होते. वर्क फ्रॉम होम दरम्यान दोघांमध्ये सतत वाद होत होते. राकेश दररोजच्या वादाला वैतागलेला असताना त्याने गौरीला ठार मारण्याचे नियोजन केले. रागाच्या भरात असलेल्या राकेशने गौरीच्या पोटात चाकूने वार केले. त्यानंतर गळा चिरुन तिची हत्या देखील केली. खून केल्यानंतर पीडितेचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला. पीडित महिला ही मास मीडियामध्ये पदवीधर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः गौरीच्या आई-वडिलांना फोन करुन खूनाची माहिती दिली होती. खून केल्यानंतर राकेशने त्याच्या घरमालकाला सुद्धा फोन करून पत्नीचा खून केल्याची माहिती दिली आणि "मी निघून चाललो आहे" असं सांगितलं होते. त्यानंतर घरमालकाने तात्काळ पोलिसांना सर्व प्रकरणाची माहिती दिली. दरम्यान सदर प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर आरोपी साताऱ्याला पळून आला अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे. हुलीमावू आणि पुणे पोलिस यांच्यातील समन्वयाने आरोपीचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. त्यावेळेस आरोपीला शिरवळ येथून अटक करण्यात आली आहे. मात्र राकेशने विष प्राशन केल्याचे समोर आले. त्याला तात्काळ पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील चौकशीसाठी राकेशला बेंगलूरला नेण्यासाठी एक पथक पुण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेशची चौकशी केली असता, त्याने सदर प्रकार पोलिसांना सांगितला, राकेश म्हणाला की, "बुधवारी जेवण करताना आमचा किरकोळ वाद झाला. रागाच्या भरातून स्वंयपाकघरातील चाकूने गौरीवर तीन- चार वार केले. ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला."