Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीच्या मृत्यूनंतर सुशील हगवनेची 'ती' फेसबुक पोस्ट चर्चेत, "सूना घराबाहेर पडल्या तर..."

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीच्या मृत्यूनंतर सुशील हगवनेची 'ती' फेसबुक पोस्ट चर्चेत, "सूना घराबाहेर पडल्या तर..."

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणानंतर नवनवीन गोष्टी समोर आली आहे. वैष्णवीचा दीर सुशील हगवणेची फेसबुक पोस्ट आता चर्चेत आली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण महाराष्ट्रात चांगचलं पेटून उठलं. यादरम्यान वैष्णवीवर अत्याचार करणारे प्रत्येक जण आज अटकेत आहेत. त्याचसोबत तिच्या मुलाचा ताबा देखील तिच्या माहेरच्या लोकांकडे देण्यात आला. तसेच तिच्या सासऱ्याला आणि दिराला देखील राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून हकलवण्यात आलं आहे. अशातचं आता वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणानंतर नवनवीन गोष्टी समोर आली आहे. वैष्णवीचा दीर सुशील हगवणेची फेसबुक पोस्ट आता चर्चेत आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना सुशील हगवणे याने लोकसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीतील तत्कालीन उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान सुशील हगवणेनं एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यात त्यानं सुना घराबाहेर पडल्या तर इतिहास घडवू शकतात असं म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे बारामतीत लोकसभा निवडणूक लढवली होती.

राष्ट्रवादी अजित पवार पक्षात असलेला सुशील हगवणे हा त्यावेळी त्यांच्या प्रचारादरम्यान मैदानात उतरला होता. यावेळी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात लिहलं होत की, "यावेळी लेकीला नाही सुनेला निवडून आणुया....सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःच साम्राज्य पण उभारू शकतात सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया.... एक मत सूनेसाठी" मात्र वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर सुशीलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत.

वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे. आत्महत्येच्या आदल्या दिवशी तिला सासरच्या लोकांकडून जबर मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या शरीरावर तब्बल 29 जखमा आढळल्या असून, त्यापैकी 15 जखमा 24 तासांमध्ये झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयात तपशील मांडत पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 28 मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com