America Crime : अमेरिकेत दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या, एका व्यक्तीला अटक
अमेरिकेत दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्का प्रकार अमेरिकेतील व्हर्जिनिया भागातील लँकफोर्ड हायवे या ठिकाणी असलेल्या स्टोअरमध्ये घडला आहे. ही घटना 20 मार्चला रोजी पहाटे 5:30 मिनिटांनी ही घटना घडली असून या घटनेत भारतीय वंशाच्या प्रदीप पटेल आणि त्यांच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
20 मार्च रोजी अॅकोमॅक काउंटीमधील त्यांच्या दुकानात काही लोक दारु खरेदी करण्यासाठी दुकानात गेले मात्र, रात्र झाल्या कारणाने त्यांनी दुकान बंद केल्याची माहिती होती. रात्री दुकान का बंद केले असं हल्लेखोरांनी त्यांना विचारले. त्यानंतर काही वेळाने प्रदीप पटेल आणि त्यांच्या मुलीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात प्रदीप पटेल जागीच ठार झाले आणि त्यांच्या मुलीने उर्मीने रुग्णालयात उपचारादरम्यान आपला जीव सोडला. या हत्येप्रकरणी जॉर्ज फ्रेझियर डेव्हॉन व्हार्टन या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, या हत्येमुळे अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.