Crime
आम्ही CID पोलीस असल्याच सांगून नागरिकांना फसवणाऱ्या टोळीला अटक
उमाकांत अहीरराव | धुळे जिल्ह्यामध्ये आपण CID पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना फसवणाऱ्या इराणी टोळीच्या धुळे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यांच्यावर एकूण २५ गुन्हे दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहे.
अवघ्या 4 तासातच मालेगाव येथील इराणी टोळीतील पाच सदस्यांना पोलिसांनी जेरबंद केलं असून, संशयितांकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल, तसेच स्कॉर्पिओ जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी अकबर पठाण याच्यावर महाराष्ट्र गुजरात राज्यात 25 गुन्हे दाखल असून इराणी टोळीतील या संशयितांनी धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात विविध गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मालेगाव सह मुंबईतील रहिवासी असणारे हे संशयित इराणी गॅंगचे सदस्य असून त्यांनी अजून कुठे गुन्हे केले आहेत का याचा आत्ता धुळे पोलीस तपास करत आहे.