अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास एटीएसकडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास एटीएसकडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

Published by :
Published on

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकामार्फत (एटीएस) करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (5 मार्च) जाहीर केले. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्याची मागणीही विरोधकांनी केली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टिलिया या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या जीवाला धोका असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले होते. मात्र, त्यांचा मृतदेह ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत सापडला. या सर्व प्रकरणाबाबत संशय व्यक्त करताना फडणवीस यांनी, गृहमंत्री कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करीत आहेत. तो कोण आहे, असा सवाल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्याची मागणी केली. यानंतर अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्याची घोषणा केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com