Beed Santosh Deshmukh Case : अमानुष मारहाण, लघुशंका, शरीरावर क्रूर वार संतोष देशमुखांच्या हत्येचे विदारक फोटो
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याप्रकरणी वाल्मिक कराडला दोषी ठरवण्यात आले आहे. आता त्यांच्याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आणि हत्या करतानाचे फोटो समोर आले आहेत. संतोष देशमुख यांना अपहरण झाल्यानंतर मारहाण करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत.
समोर आलेल्या फोटोमध्ये संतोष देशमुखांना कशी मारहाण झाली आणि त्यांची हत्या करण्यात आली हे दिसून येत आहे. हे काही फोटो आरोप पत्रातही जोडण्यात आले आहे. या फोटोंमध्ये सुदर्शन घुले संतोष देशमुखांना मारहाण करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे संतोष देशमुख यांचे कपडे काढल्यानंतर त्यांना कशाप्रकारे वागणूक दिली हेदेखील फोटोंमध्ये बघायला मिळत आहे. आरोपी सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हैवानी पद्धतीने हसत हसत मारहाण करत आहेत. त्यांच्या डोळ्यांमध्ये पश्चातापही दिसत नसल्याचे आरोप पत्रात म्हंटले आहे. तसेच अर्धमेल्या अवस्थेत त्यांच्यावर वारही करण्यात आले. जीव जाईपर्यंत संतोष देशमुखांचा व्हिडीओ शूट केला आहे.