Pune Crime : आंबेगाव येथील महिला खून प्रकरणाचा उलगडा! आरोपी शाहरुख मन्सूरला अटक

Pune Crime : आंबेगाव येथील महिला खून प्रकरणाचा उलगडा! आरोपी शाहरुख मन्सूरला अटक

पुण्यात घडलेल्या धक्कादायक महिला खून प्रकरणाचा यशस्वी तपास करत भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

पुणे शहरातील आंबेगाव परिसरात दिनांक 20 मे 2025 रोजी घडलेल्या धक्कादायक महिला खून प्रकरणाचा यशस्वी तपास करत भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपी शाहरुख मन्सूर (रा. मध्यप्रदेश) याला विशेष पथकाने मध्यप्रदेशमधून ताब्यात घेतले असून, त्याच्यावर याआधीही पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

तपास कार्यात पोलिसांनी कोल्हेवाडी ते नवले ब्रिज दरम्यान 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली तसेच संबंधित महिलेसोबत शेवटचे दिसलेली रिक्शा शोधण्यासाठी तब्बल 1200 रिक्षांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून आरोपीची ओळख पटली आणि तो मध्यप्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथक रवाना करून त्याला ताब्यात घेण्यात आले.

ही तपासणी अत्यंत गुंतागुंतीची असून पोलिसांनी चिकाटी आणि तांत्रिक साधनांचा वापर करत ही केस यशस्वीरीत्या सोडवली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत असून, आरोपीकडून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com