Panvel Crime : पनवेलमध्ये धक्कादायक घटना, पोटच्या मुलीवर अत्याचार;

पनवेलमध्ये जन्मदात्या पित्याने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीची रवानगी कोठडीत केली आहे.
Published by :
Team Lokshahi

पनवेलमध्ये जन्मदात्या पित्याने मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

पनवेल परिसरात ही घटना घडली. ११ वर्षीय मुलीबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करत पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पीडितेला शंभर रुपये देऊन घडलेला प्रकार कोणाला सांगू नकोस, असे पित्याने सांगितले. ही घटना १ फेब्रुवारी २०२५ रात्रीच्या सुमारास घडली. सकाळी उठल्यावर घडलेला सर्व प्रकार पीडितेने आईला सांगितला. परंतु जन्मदाता बाप असल्याने आईने या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. ४ फेब्रुवारीला पीडीत मुलीला घेऊन आईने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठले. नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी नराधाम पित्यास अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीची रवानगी कोठडीत केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com