Salman Khan : सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, गाडी बॉम्बनं उडवणार आणि...

हमी कडेकोट सुरक्षेत फिरणाऱ्या सलमानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
Published by :
Shamal Sawant

बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ला बिश्नोई गँगकडून करण्यात आल्याचे समोर आले होते. या सगळ्या प्रकारानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली. या संपूर्ण घटनेनंतरवांद्र्यातील गॅलेक्सीमधील घराच्या गॅलरीलाही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या आहेत. नेहमी कडेकोट सुरक्षेत फिरणाऱ्या सलमानला आता त्याची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. यामध्ये घरात घुसून मारणार आणि गाडी बॉम्बने उडवणार अशी धमकी सलमान खानला देण्यात आली आहे, वरळी पोलिसांनी मेसेज करणा-या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानने काळवीट शिकार केली होती. तेव्हापासून सलमान खानला बिश्नोई गॅंगकडून सतत धमक्या मिळत आहेत. त्याचप्रमाणे सलमान खानचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गॅंगने घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी सलमान आणि शाहरुख खानलादेखील जीवे मारण्याच्या धमक्या मिळूलागल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com