Thane : QR code ने घेतली लाच; ठाण्यात दोन पोलिसांसह एकाला अटक
लाच मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही आपल्याकडे लाच सहजपणे घेतली जाते. यातच आता ठाण्यात लाच मागण्याचा वेगळाच प्रकार प्रकार समोर आला आहे. चक्क क्यूआर कोड (QR code) स्कॅन Scan करुन लाच घेण्यात आली आहे.
मोबाईल फोन क्रमांकाचा डेटा Data चोरुन विकला जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणात दोन पोलिसांसह एकाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या एकाला अट करण्यात आले होते. त्याच्याकडे पीएसआय पोलीस अधिकाऱ्यांचा ड्रेस, पोलिसांची काठी, टोपी, पोलिसांचे स्टिकर आदी वस्तू आढळल्या आहेत. तसेच तो लॉजवर राहत असल्याची माहिती मिळत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
5 मे रोजी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात मोबाइलमधील डेटा चोरी करुन विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणातील आकाश सुर्वे आणि हर्षद परब या दोन पोलिसांसह मोहम्मद सोहेलला पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेने त्या तिघांचे फोन नंबर घेतले असून लाच घेणारा क्यूआर कोड एका पोलीस शिपायाचा असल्याची माहिती समोर आली आहे.