Satara Doctor Suicide : "तळहाताच्या फोडाप्रमाणे लेकराला जपलं" पीडित डॉक्टरच्या आईची लेकीसाठी तळमळ, हंबरडा फोडत म्हणाल्या...
डॉक्टर संपदा मुंडे यांनी केलेल्या आत्महत्या बद्दल नागरिकांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. या प्रशासनातील अधिकारी जर असे कृत्य करीत असतील तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा असं नागरिकांकडून म्हटलं जात आहे. जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
"आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे लेकराला जपलं नको नको ते हाल शोषून लेकराला शिकवलं डॉक्टर बनवलं आणि आज ही परिस्थिती असेल तर आम्ही करायचं काय आम्ही न्याय कोणाला मागायचा", असा थेट सवाल आता मुख्यमंत्र्यांनाच संतप्त नागरिकांनी केला आहे.
गुरुवारी 23 ऑक्टोबरला साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. डॉ. संपदा मुंडे असं त्या महिला डॉक्टरच नाव असून काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. ”माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन” अशी त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती. अखेर गुरुवारी रात्री डॉ. संपदा मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. त्या नोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, "PSI गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार अत्याचार आणि लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केला". या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलिस प्रशासनात शोककळा पसरली आहे.

