कोरियन सिंगर ग्रुपची ओढ; मुलांनी उचलंल टोकाचं पाऊल
धाराशिवमधील धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरियन सिंगर ग्रुपच्या भेटीसाठी 3 अल्पवयीन मुलींच्या स्वतःच्या बनावट अपहरणाचा कट रचला. मात्र हा कट धाराशिव पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हणून पाडला आहे. पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटात 3 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा बनाव उघडकीस आला आहे.
समाज माध्यमातून कोणाच्या मनावर काय परिणाम होईल सांगता येत नाही. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील तांड्यावर राहणाऱ्या शाळकरी मुलींना सोशल मीडियावरील रिल्स अन् युट्यूब वरील व्हिडिओ पाहून BTS V या कोरियन सिंगर ग्रुपची आवड निर्माण झाली. अन् त्यांनी या ग्रुपच्या भेटीसाठी कोरियाला जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुटुंबीय विरोध करतील म्हणून त्यांनी चक्क स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला.
तुरोरी येथे या मुली शिक्षण घेत होत्या शाळा सुटल्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या स्कूल बस मधून काही लोकांनी या मुलीचे अपहरण केल्याचा कॉल उमरगा पोलिसांना आल्यानंतर ऑपरेशन मुस्कान राबवित अवघ्या 30 मिनिटात पोलिसानी याचा छडा लावलाय. घरातील पाच हजार रुपये घेऊन या मुली पुण्याकडे निघाल्या होत्या. पुण्यात जाऊन पैसे कमवू आणि थेट कोरियाला जाऊ अस त्यांचं नियोजन होत. मात्र पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून मुलींचे लोकेशन मिळवून मोहोळ येथे मुलींना गाठत संपूर्ण प्रकार उघड केलाय. आता या मुलींना कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पोलीस सर्व अंगाने तपास करतायत.