Crime
दारू पार्टीच्या वादातून तरुणाचा खून: चोपडा तालुक्यातील घटना
चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे दारूची पार्टी सांगितल्याच्या वादातून तरुणाचा खून. चार ते पाचजणांनी मारहाण करीत डोक्यात लाकडी दांडके टाकल्याने तरुणाचा मृत्यू.
चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील तरुणांनी एकत्र येत दारूची पार्टी केली. पार्टी केल्याची गोष्ट त्यातीलच एकाने मित्रांच्या घरी सांगितल्याचा राग मनात ठेवत चार ते पाचजणांनी जबर मारहाण करीत त्याच्या डोक्यात लाकडी दांडके टाकले. यात जखमी झालेल्या दादा बारकू ठाकूर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चोपडा शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादा ठाकूर आणि काहीजणांनी दोन-चार दिवसांपूर्वी पार्टी केली. मात्र दादा ठाकूर यानेच काहींच्या घरी पार्टी केल्याची माहिती दिली, असा संशय आल्याने चार ते पाच जणांनी मिळून गावात दादा ठाकूर यास मारहाण केली. मारहाणीत त्याच्या डोक्यात लाकडी दांडके टाकल्याने तो जबर जखमी झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.