Pandharpur
Pandharpur

Pandharpur : मायलेकाच्या हत्येने पंढरपूर शहर हादरलं; अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने केली हत्या

पंढरपूरमधील कुंभारवाडी परिसरात काल (15 जुलै) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Pandharpur ) पंढरपूरमधील कुंभारवाडी परिसरात काल (15 जुलै) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. कुंभार गल्लीतील  गरीब कुटुंबातील मायलेकांची घरात घुसून अज्ञात व्यक्तींनी गळ्यावर वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पीडित कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. हत्येच्या दिवशी मृत महिलेचा मुलगा दिवसभर कुरिअर वितरणाचे काम करून सायंकाळी साडेनऊच्या सुमारास घरी परतला होता. त्यानंतर काही वेळातच अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, गुन्हेगार लवकरच शोधले जातील , असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे पंढरपूरच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे व संशयास्पद हालचाली पोलिसांना तात्काळ कळवाव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com