Delhi Crime
Delhi Crime

Delhi Crime: दिल्ली हादरली! नराधामाकडून ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, पोलिसांकडून आरोपी अटक

Crime News: दिल्ली नरेला येथे ४ वर्ष मुलीचे अपहरण करून बलात्कार केला. मदरसा रस्त्यावर दारूड्या रिझवानने हल्ला, पोलिस अटक करण्यात आलं.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

दिल्लीतील नरेला औद्योगिक क्षेत्रात बुधवारी एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण आणि बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी रिझवानला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जाते.

Delhi Crime
Crime News: पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या; घरी सापडल्या ३ डायऱ्या, सत्य काय?

चार वर्षांची पीडित मुलगी तिच्या कुटुंबासहित नरेला औद्योगिक क्षेत्रात राहते आणि तिला उर्दू शिकण्यासाठी जवळच्या मदरशात पाठवले गेले होते. बुधवारी ती मदरशात जात असताना आरोपीने तिला एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर नेऊन बलात्कार केला. मदरशाचे संचालक ६० वर्षीय मोहम्मद नवाज मुलीसाठी शोध घेत असताना, दुसऱ्या मजल्यावरून रडण्याचा आवाज ऐकून त्याने काही लोकांसह तिकडे पोहोचले. तेथे त्यांना मुलगी नग्न अवस्थेत जमिनीवर पडलेली सापडली, तर आरोपी दारूच्या नशेत पडलेला होता.

Delhi Crime
Crime News: धक्कादायक! मुलांच्या भांडणाचा घेतला सूड; मारहाणीत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मदरसा संचालकाने तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले असून आरोपीला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले आहे. मदरसा संचालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार, अपहरण आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी एसआय ज्योती यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com