दिशा सालियान प्रकरणात आता करुणा मुंडेंनी घेतली उडी, पूजा चव्हाणच्या न्यायची केली मागणी

दिशा सालियान प्रकरणात आता करुणा मुंडेंनी घेतली उडी, पूजा चव्हाणच्या न्यायची केली मागणी

करुणा शर्मा यांनीदेखील या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे असून त्यांनी पूजा चव्हाणदेखील न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

दिशा सालीयान मृत्यू प्रकरणातील आज मोठी अपडेट समोर आली. दिशाच्या वडिलांनी आता मुंबई उच्च न्यायालयांमध्ये धाव घेतली आहे. या सगळ्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरदेखील आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे पाच वर्षांनी पुन्हा या प्रकरणाने डोकं वर काढले आहे. या सगळ्या चर्चामध्ये अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान आता करुणा मुंडे यांनीदेखील या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे असून त्यांनी पूजा चव्हाणदेखील न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या की, "ज्या प्रकारे दिशा सालियनसाठी न्यायाची मागणी होत आहे. तसाच न्याय पूजा चव्हाणलादेखील न्याय मिळाला पाहिजे. पूजा एक बंजारा समाजातील एक गरीब घरातील मुलगी होती. तिच्या हत्येचे सगळे पुरावे होते. तिचे कोणत्या मंत्र्यासोबत संबंध होते, काय काय होतं हे त्यावेळी सगळ्यांच्या समोर आलं होतं. मात्र तरीही तिला न्याय मिळाला नाही. पण आज पाच वर्षांनंतर दिशा सालियनसाठी न्यायाची मागणी होत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण पुजा चव्हाणला पण न्याय द्या. मला असं माहीत पडलं होतं, चित्रा वाघ ताईंनी पण खटला टाकलेला आहे".

पुढे त्या म्हणाल्या की, "ज्याच्यामध्ये त्यांनी माघार घेण्यासाठी अर्ज दिला होता. पण जर त्यांनी माघार घेतली तर मी पण आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून मी लवकरात लवकर हाय कोर्टामध्ये या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे, आणि पूर्ण पुराव्यासहित मी लवकरात लवकर पत्रकार परिषद घेणार आहे, पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे", असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com