Crime
निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी,काठीनं मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत झालेला पराभव जिव्हारी लागला, आणि त्यानंतर लग्नात कोरोनाचे नियम न पाळल्याने ग्रामपंचायतने दिलेला पन्नास हजाराचा दंड. या दोन्ही घटनेला जबाबदार असल्याच्या रागातून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावातील मुंडे दाम्पत्याला माजी उपसरपंच गजेंद्र येवले व अन्य दोघांनी जीवघेणी मारहाण केली आहे.
या प्रकरणी चिखलदरा पोलीसांनी माजी उपसरपंचासह चार जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मारहानीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,या दोन्ही घटनेला मुंडे दाम्पत्याला जबाबदार धरून लाठी काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. असा आरोप करण्यात आला आहे.