Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिला कीर्तनकाराला आश्रमात घुसून दगडाने ठेचून मारलं

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका आश्रमात घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Chhatrapati Sambhajinagar Crime ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका आश्रमात घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका महिला कीर्तनकाराची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ह भ प संगीताताई महाराज असे या महिला कीर्तनकाराचे नाव असून, त्यांचा मृतदेह आश्रमातच आढळून आला.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याचा अंदाज आहे. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात मारेकऱ्याने आश्रमात प्रवेश करून त्यांच्यावर दगडाने हल्ला केला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाच्या साहाय्याने तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com