Pune Crime News : अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाने मागितली माफी; येरवडा पोलिस ठाण्यात सरेंडर होणार!
पुण्याच्या शास्त्रीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचाकी गाडी उभी करून दारुच्या नशेमध्ये तरुणाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणाने रस्त्याच्या मधोमध चारचाकी उभी करुन सिंग्नलवर लघुशंका केल्याची घटना समोर आली.
सदर किसळवाणा प्रकार हा येरवडा परिसरात आज सकाळी 7.30 वाजता घडला. लघुशंका करणारा तरुण नशेमध्ये होता. सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी आरोपी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश निबजिया दोघांना ताब्यात घेतले असून गौरव आहुजा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान या तरुणाचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या किळसवाण्या घटनेवर राजकिय नेत्यांनी लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्या आहेत.