Uttar Pradesh Kasganj Crime : मुलीच्या संसारात आईनेच लावली आग! आई आणि जावयाच्या संबंधांमुळे बळी गेली निष्पाप पत्नी
कोणतही नात म्हटलं की, त्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. मगं हे नात भावंडांच असो पालक आणि मुलांच असो किंवा नवरा-बायको यांच्या वैवाहिक जिवनातील असो, कोणत्याही नात्यात अडकण्यासाठी त्या व्यक्तींमध्ये आणि त्यांच्या नात्यात एकमेकांप्रती आदर, प्रेम आणि विश्वास हा लागतोच. तरचं ते नात अतूट राहत आणि टिकतं देखील मात्र सध्याच्या घडीला नात टिकवणं फार अवघड झालं आहे.
त्यात पण जर ते नात नवरा-बायको यांच्यातील असेल तर त्यांच्यात कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीमुळे या पवित्र नात्याला काळीमा फासला जातो. अशा अनेक घटना आतापर्यंत कानावर पडल्या आहेत. अशातच यूपीच्या कासगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आईनेच स्वतःच्या लेकीच्या संसारात विष कालवलं आहे. स्वतःच्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवले ज्याचा परिणाम भोगावा लागला शिवानीला.
नेमकं प्रकरण काय ?
यूपीच्या कासगंज जिल्ह्यात राहणाऱ्या शिवानीचं लग्न प्रमोदसोबत झालं होत. त्यानंतर तो शिवानीच्या घरी म्हणजे त्याच्या सासरी बऱ्याचदा फेऱ्या मारु लागला. त्यानंतर शिवानीच्या आईमध्ये आणि प्रमोदमध्ये जवळीक वाढू लागली. ज्याच रुपांतर अफेअरमध्ये झाल. मागच्या सहा महिन्यांपासून दोघांमध्ये अफेअर सुरु होतं. आधी हे दोघ फक्त घराच्या चार भिंतीमध्ये भेटू लागले होते, मात्र त्यांनी त्यांच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.
त्या दोघांचे काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या नात्याची भनक त्यांच्या आसपासच्या लोकांना आणि नातेवाईकांना लागल्यानंतर शिवानीने प्रमोदसोबत याविषयी बोलण्याचं ठरवलं. मात्र शिवानी जेव्हा जेव्हा प्रमोदसमोर हा विषय काढायची त्यावेळेस त्या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु व्हायचं. शिवानीचा मृत्यू होण्यापूर्वी देखील त्या दोघांमध्ये या विषयावरुन जोरदार वाद झाला होता.
त्यावेळेस प्रमोदने शिवानीला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रमोदने केलेली मारहाण शिवानीच्या जिवावर आली. तिने काही क्षणातचं जीव सोडला आणि ज्यावेळेस नातेवाईक तिथे पोहचले त्यावेळेस तिचा मृतदेह दरवाजात पडलेला होता. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असता पोलिसांनी शिवानीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासात शिवानीचा मृत्यू गळा आवळण्यामुळे झाला असल्याची माहिती समोर आली आहे.