Solapur Crime : संतापजनक! वडिलांना पाहिलं 'त्या' अवस्थेत अन् चिमुकली मुकली जीवाला; जन्मदात्यानेच केलं...

धक्कादायक! सोलापूरमध्ये जन्मदात्यानेच चिमुकलीचा खून; पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Published by :
Riddhi Vanne

दक्षिण सोलापूरमधील कूसुर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःच्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची कुठेही वाच्यता कुठेही करु नये, म्हणून एका नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या आठ वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून निर्घुण हत्या केली. आरोपी ओगसिद्ध कोठे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हा मृत्यूदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृत्यूदेह सापडला त्यावेळेस पोलिसांना आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवली होती. परंतू मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला,त्यावेळेस गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

दक्षिण सोलापूरमधील कूसुर गावात मृत चिमुकली श्रावणी हिने स्वतःच्या वडिलांना आणि आजीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. या प्रकरणाबाबत कुठेही बोलू नये. यासाठी नराधम बापाने पीडित मुलीची बेदम मारहाण केली होती. त्यानंतर पत्नी वनिता कोठे घरी नसताना त्याने चिमुकलीचा गळा दाबून खून केला. इथेच न थांबता त्याने मृतदेह घरासमोरच खड्डा खोदून पुरला. गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पोलिस गाठले. या प्रकरणातील आरोपी ओगसिद्ध कोठे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com