Nalasopara Crime: प्रियकरासोबत राहता यावे म्हणून पत्नीचा अजबच कारनामा; नवऱ्याला जीवे मारलं अन् मृतदेह...

Nalasopara Crime: प्रियकरासोबत राहता यावे म्हणून पत्नीचा अजबच कारनामा; नवऱ्याला जीवे मारलं अन् मृतदेह...

नालासोपारा येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका महिलेने आपल्याच नवऱ्याचा जीव घेऊन त्याला चक्क स्वतःच्याच घरात पुरून ठेवले.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबईमधील नालासोपारा येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका महिलेने आपल्याच नवऱ्याचा जीव घेऊन त्याला चक्क स्वतःच्याच घरात पुरून ठेवले. ही खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणातील आरोपी हे फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मुंबईमधील नालासोपारा येथील गडगपाडा येथील साई वेल्फेअर सोसायटीच्या एका खोलीमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेने आपल्या प्रियकरासोबत राहता यावे यासाठी आपल्या नवऱ्याचा खून केला. विशेष म्हणजे आपल्या नवऱ्याचा खून केल्यानंतर याचा कोणाला थांगपत्ता लागू नये यासाठी त्याचे प्रेत स्वतःच्याच घरी पुरले. तसेच त्याठिकाणी मजुरांकडून टाईल्स लावून घेतले.

त्या महिलेचे नाव गुडिया उर्फ चमन असून तिच्या पतीचे नाव विजय चौहान असे आहे. ती महिला ज्या चाळीमध्ये राहत होती त्याच चाळीत तिचा 22 वर्षीय मोनू विश्वकर्मा नावाचा प्रियकर राहत होता. चाळीमध्ये एकाच ठिकाणी राह्ल्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र विजय हा त्यांच्यामधील अडथळा बनत असल्याने चमन आणि मोनू यांनी त्याचा काटा काढायचे ठरवले. चमन आणि विजय या दोघांना एक 8 वर्षांचा मुलगा आहे. या सर्व प्रकरणाचा उलगडा हा विजयच्या नातेवाईकांमुळे झाला. कारण 15 दिवसांपासून ते विजयला फोन करत होते मात्र त्यावर त्याचे काही उत्तरच येत नव्हते. तसेच काही नातेवाईक त्याच्या घरी सुद्धा आले मात्र विजय त्यांना तिथे दिसला नाही.

काही नातेवाईकांनी कांदिवली, कुर्ला और बोरीवली याठिकाणी राहणाऱ्या नातेवाईकांकडे सुद्धा चौकशी केली मात्र काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान काही नातेवाईकांना त्याच्या पत्नीच्या हालचालींमध्ये संशय आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार सुद्धा केली. त्याप्रमाणे पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. 19 जुलै नंतर चमन आणि तिचा मुलगा हे घरातून निघून गेले. संशय अधिकच बळावला. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता हा सर्वप्रकार उघडकीस आला. 22 वर्षीय मोनू विश्वकर्मा यांच्या घरच्यांनी सुद्धा एक दोन वेळा चमनशी बोलताना त्याला पकडले होते. त्याला शिक्षा म्हणून त्याचा फोन स्वतःकडे ठेवला होता. याप्रकणी मृत व्यक्तीची पत्नी चमन आणि तिचा प्रियकर मोनू विश्वकर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com