Vaishnavi Hagawane Case Update: अजित पवार यांचा मोठा निर्णय, हगवणे पिता-पुत्रांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

Vaishnavi Hagawane Case Update: अजित पवार यांचा मोठा निर्णय, हगवणे पिता-पुत्रांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

अजित पवारांचा निर्णय: वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे पिता-पुत्रांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
Published by :
Team Lokshahi
Published on

पुणे पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलले असल्याची अशी प्राथमिक पोलीस तपासादरम्यान समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी वैष्णवीचे सासरच्या लोकांनी तिच्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे.

शशांक हगवणे हा पत्नी वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठी छळ करत होता. २०२३ साली वैष्णवीने ती गरोदर असल्याची बातमी दिल्यानंतर तिचा पती शशांक हा तिच्यावर संशय घेऊ लागला. 'हे बाळ माझे नाही' असे बोलून वैष्णवीला मारहाण करुन तिला शिव्या देऊ लागला. दरम्यान शशांक वैष्णवीकडे हुंड्यासाठी मारहाण करत होता. मानसिक छळाला कंटाळून तीने आत्महत्ये सारखे टोकाचं पाऊल उचलले. वैष्णवीच्या घराच्यांनी शशांकवर आणि त्याच्या कुटुंबावर आत्महत्या नसून हत्या असल्याची अशी तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पती शशांक हगवणे याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे फरार आहेत. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते. दरम्यान वैष्णवी आणि शशांक यांचा लग्नाचा व्हिडिओ समोर आला असून त्या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार हगवणे परिवारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार का? असा सवाल विरोधकांकडून सतत येत होता. त्यावर माझा त्या हगवणे कुटुंबाशी काही संबंध नसल्याचे अजित पवारांनी जाहीर केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या कुटुंबाविरोधात मोठा निर्णय घेत पिता-पुत्राला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com