India VS Pakistan Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सॲप चॅटिंगमधून मोठा कट उघडकीस
पाकिस्तानला संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत नवीन खुलासे होत आहेत. ज्योती ही चीन आणि पाकिस्तान पाठोपाठ बांगलादेशलाही जाण्याच्या तयारीत होती. यासाठी तिनं बांगलादेशच्या व्हिसासाठीही अर्ज केला होता, अशी माहिती मिळत आहे. तसंच पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिच्या बांग्लादेश दौऱ्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दुसरीकडे ज्योती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी काम करत होती. भारतात उपस्थित असलेल्या गुप्तचर एजंट्सची ओळख उघड करण्याचा प्रयत्न करत होती असा संशय तपास यंत्रणांना आहे. ज्योती आणि ISI एजंट अली हसन यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटिंगद्वारे हे मोठे कट उघड झाले आहे. दोघांमध्ये कोड वर्डमध्ये सतत संवाद होत होता, ज्यामध्ये अनेक संशयास्पद हालचालींचा उल्लेखही समोर आल्याची माहिती मिळत आहे.