संतोष देशमुख हत्येचे फोटो समोर येताच करुणा मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, "दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी..."

संतोष देशमुख हत्येचे फोटो समोर येताच करुणा मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, "दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी..."

आज एसआयटी आणि सीआयडीने चांगला तपास केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना अमानुषपणे मारहाण करत आहेत. त्यांच्यावर लघुशंकाही करत आहेत. अर्धमेल्या अवस्थेत त्यांच्यावर क्रूरपणे वारही करण्यात आले. त्यांचे हे फोटो समोर आले आहेत. यावर करुणा मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या की, "ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. हे फोटो माझ्या हाती आले आणि हे फोटो बघून मला धक्का बसला. माझ्याकडे काहीच शब्द नाहीत. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी तुम्ही ही अवस्था केलीत. आज एसआयटी आणि सीआयडीने चांगला तपास केला आहे. या लोकांना इतका कोणाचा पाठिंबा आहे. इतका क्रूरपणा कसा केला असेल. सुरुवातीला वाल्मिक कराडने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com