Nagpur Crime : शेतीतील पाण्याच्या वाद विकोपाला; सख्खा भाऊ ठरला वैरी, कळमेश्वर तालुक्यात लहान भावाची निर्घृण हत्या
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur Crime ) कळमेश्वर तालुक्यात लहान भावाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सख्खा भावानेच हत्या केली असल्याचे समोर आले असून शेतीतील पाण्याच्या वादावरुन ही हत्या करण्यात आली आहे.
मोठ्या भावाने गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 43 वर्षीय अरुण तुरारे अस मृतकाचं नाव असून चंद्रशेखर तुरारे असं आरोपीचे नाव आहे. मागील तीन वर्षांपासून विहीर, पाणी, पाइपलाइन आणि शेत रस्त्यावरून या दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकून जाळल्याची आरोपीने कबुली दिली. चार दिवसांपूर्वी रस्ता वादातून भावंडांमध्ये तीव्र भांडण झाले होते. पत्नीच्या तक्रारीवरून पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Summery
शेतीतील पाण्याच्या वाद विकोपाला, सख्खा भाऊ ठरला वैरी
कळमेश्वर तालुक्यात लहान भावाची निर्घृण हत्या
मोठ्या भावाने गोळ्या झाडून केली हत्या, त्यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला
