Kolkata Sanjay Roy: कोलकाता अत्याचार प्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा

Kolkata Sanjay Roy: कोलकाता अत्याचार प्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा

कोलकाता बलात्कार प्रकरण: आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा, पीडित कुटुंबाला 17 लाख रुपयांची भरपाई
Published by :
Prachi Nate
Published on

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी 31 वर्षीय महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून त्या महिला डॉक्टरवर क्रूरपणे हल्ला करण्यात आला होता ज्यामध्ये त्या महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या महिला डॉक्टरच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमाच्या खुणा होत्या.

या घटने दरम्यान गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी सीबीआय कोर्टाने बंद खोलीत सुनावणी सुरू केली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय जो वैद्यकीय स्वयंसेवक होता त्याच्या विरोधात बीएनएस धारा 64,66, 103/1 च्या कलमांतर्गत पाच महिन्यात आरोपपत्र दाखल होऊन त्याला अटक झाली होती. यादरम्यान सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी रॉयला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या घटनेने संपुर्ण देश हादरलं होत.

याचपार्श्वभूमीवर आता कोलकाता महिला डॉक्टरच्या झालेल्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपी संजय रॉयला 18 जानेवारी रोजी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचसोबत पीडित महिलेच्या कुटुंबाला न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तर न्यायालयाने 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. नकोलकात्यातल्या सियालदह कोर्टाने हा निर्णय देताना असे म्हटलं आहे की, हा घडलेला प्रकार किरकोळ गुन्हा नसून त्याला दुर्मिळातील दुर्मिळ असे म्हटले नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com