कोरेगाव भीमा  प्रकरणातील नऊ पैकी एका आरोपीला जामीन मंजूर

कोरेगाव भीमा प्रकरणातील नऊ पैकी एका आरोपीला जामीन मंजूर

Published by :
Published on

कोरेगाव भीमा प्रकरणातील 9 आरोपींपैकी एका आरोपीला जामीन मिळाला आहे. तर 8 आरोपींचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) नामंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. भीमा कोरेगाव प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज ( Sudha Bharadwaj Bail ) यांना डिफॉल्ट जामीन मंजूर केला. कोरेगाव भीमा दंगल प्रकरण व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नऊ जण अटकेत आहेत.

भारद्वाज यांना विशेष एनआयए कोर्टात ८ डिसेंबर रोजी हजर करावे, त्यानंतर ते कोर्ट भारद्वाज यांच्या जामिनाविषयी अटी ठरवेल, असे न्यायमूर्ती संभाजी शिंदे व निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणातील इतर आठ आरोपींची याचिका मात्र न्यायालयाने फेटाळली असून त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. सुधा भारद्वाज या २८ ऑगस्ट २०१८ पासून अटकेत होत्या.

एनआयए-राज्य सरकारला धक्का

हायकोर्टाच्या या निर्णयाने एनआयए आणि राज्य सरकारला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे कोठडी आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी संबंधित कोर्ट विशेष कायद्यांतर्गत असायलाच हवे, असे नाही, असा दावा एनआयए आणि राज्य सरकारने केला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com