21-YEAR-OLD STUDENT SET ON FIRE BY FRIENDS DURING BIRTHDAY PARTY
Mumbai crime news

Mumbai Crime: मुंबई हादरली! वाढदिवस साजरा केल्यानंतर मित्रांकडून अंडी अन् दगडफेक, पेट्रोल टाकून तरुणाला पेटवलं

Kurla Crime News: मुंबईतील कुर्ला परिसरात वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान मित्रांनी २१ वर्षीय विद्यार्थ्याला पेट्रोल ओतून जिवंत जाळले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबईतील कुर्ला परिसरात वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २१ वर्षीय तरुणाला त्याच्या स्वतःच्या मित्रांनी जिवंत जाळले. या कारणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या भीषण घटनेत पीडित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.

नेमकं काय घडले?

मंगळवारी सकाळी अब्दुल रहमान खान नावाच्या तरुणाला त्याच्या मित्राने वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने बोलावले. सुरुवातीला सर्वांनी मिळून केक कापला, मात्र काही वेळातच आनंदमयी वातावरणात भयंकर घडले. मित्रांनी त्याच्यावर अंडी आणि दगडफेक सुरू केली. त्यानंतर मुख्य आरोपी अयाज मलिकने आपल्या बाईकमधील पेट्रोलची बाटली काढून अब्दुलवर ओतली. विद्यार्थ्याने विरोध करूनही अयाजने लायटरने आग लावली, आणि पाहता पाहता परिसरात गोंधळ उडाला.

21-YEAR-OLD STUDENT SET ON FIRE BY FRIENDS DURING BIRTHDAY PARTY
Maharashtra News : नाशिकमध्ये सासरच्या छळामुळे विवाहितेने उचलेलं टोकाचं पाऊल

आगीने जळालेल्या विद्यार्थ्याने ओरडत पळत वॉचमनच्या केबिनकडे धाव घेतली आणि पाणी ओतण्याची विनंती केली. स्थानिक रहिवाशांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवर गंभीर भाजले गेल्याची माहिती समोर आली आहे.

21-YEAR-OLD STUDENT SET ON FIRE BY FRIENDS DURING BIRTHDAY PARTY
Dombivli Crime : डोंबिवली हादरली! 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला सुटकेसमध्ये

या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून कुर्ला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ११० अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी अयाज मलिकसह त्याचे साथीदार अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजैफा खान आणि शरीफ शेख यांना अटक केली आहे. या घटनेमुळे स्थानिक समुदायात संतापाचे वातावरण असून, पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Summary
  • मुंबईतील कुर्ला परिसरात वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान विद्यार्थ्याला जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना.

  • २१ वर्षीय अब्दुल रहमान खान गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू.

  • मुख्य आरोपी अयाज मलिकसह पाच मित्र पोलिसांच्या ताब्यात.

  • हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; कुर्ला पोलिसांकडून तपास सुरू.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com