Maharashtra News
Maharashtra NewsMaharashtra News

Maharashtra News : नाशिकमध्ये सासरच्या छळामुळे विवाहितेने उचलेलं टोकाचं पाऊल

नाशिकच्या घोटी येथील एक विवाहित महिलेने सासरच्या छळामुळे आत्महत्येचा पाऊल उचलला आहे. राणी समाधान काळे असं तिचं नाव असून, तीने विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं.
Published by :
Riddhi Vanne
Published on

नाशिकच्या घोटी येथील एक विवाहित महिलेने सासरच्या छळामुळे आत्महत्येचा पाऊल उचलला आहे. राणी समाधान काळे असं तिचं नाव असून, तीने विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. राणीचा विवाह डिसेंबर 2022 मध्ये घोटीच्या समाधान काळे याच्याशी झाला होता. प्रारंभिक काळात अपत्य न होण्यावरून सासरकडून तिला मानसिक छळ सहन करावा लागला. तीन वर्षांनंतर तिला मुलगी झाली, पण मुलगी झाल्यामुळेही सासरकडून छळ सुरूच राहिला.

राणीच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, सासरच्या लोकांनी पैशाची मागणी केली होती आणि तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. या प्रकरणात पती, सासू, दीर आणि तीन जावयांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

राज्यातील सासरी होणाऱ्या छळाच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी पुण्यात वैष्णवी हगवणे, नाशिकमधील भक्ती गुजराती आणि मुंबईतील डॉ. गौरी गर्जे यांच्या आत्महत्यांच्या घटनाही चर्चेत राहिल्या होत्या. त्यामुळे सासरच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com