Latur Crime : लातूरच्या महानगरपालिका आयुक्तांनी स्वतःवरच झाडली गोळी, तात्काळ रुग्णालयात दाखल, कारण अद्याप अस्पष्ट

बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या घरात त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Published by :
Shamal Sawant

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यातून ते बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या घरात त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यामागचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही. बाबासाहेब मनोहरे यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. नांदेड येथे त्यांनी अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला होता.

त्यानंतर लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. अतिशय स्पष्टवक्ते असलेल्या आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com