Crime
Bandra Crime : वांद्र्याच्या ट्रान्झिट कॅम्पवर छापेमारीची कारवाई; 286 किलो गांजा केला जप्त
वांद्र्याच्या ट्रान्झिट कॅम्पवर छापेमारी; 286 किलो गांजा जप्त, किंमत 71 लाख रुपये.
वांद्रे येथे 286 किलो गांजा जप्त आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 71 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. वांद्रयांच्या ट्रान्झिट कॅम्पवर छापेमारीची कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये पोलिसांनी 286 किलो गांजा जप्त केला आहे. केसी मार्ग परिसरात गांजाचे गोडाऊन असून हा गांजा मुंबईतील विविध ठिकाणी सप्लाय करण्याच्या हेतू ठेवण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 'युनिट9' चे प्रमुख दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही छापेमारीची कारवाई करण्यात आली. छापेमारी दरम्यान पोलिसांनी 36 वर्षीय आरोपी इम्रान अन्सारी नावाच्या तरुणाला अटक केली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.