आमदाराच्या मुलाने रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या
मध्य प्रदेशामधील जबलपूर येथे बरगी विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय यादव यांचा लहान मुलगा विभोर यादव याने वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली असून, पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोट मिळाली आहे. पण पोलिसांनी या सुसाइड नोटमध्ये नेमका काय उल्लेख आहे. याबाबत माहिती अजून सांगितली नाही.
आमदार संजय यादव यांचा लहान मुलगा विभोर हा बारावी इयत्तेत शिकत होता. आमदार यादव हे रिव्हॉल्व्हर स्वतःच्या सुरक्षेसाठी ठेवली होती त्याच रिव्हॉल्व्हरने घरात कोणी नसताना स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. दरम्यान चार पानी इंग्रजी भाषेत लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना घटनास्थळावर मिळाली आहे. त्याचे मित्र बोलावताहेत. माझे मम्मी आणि पप्पा खूप चांगले आहेत, असा मजकूर या नोटमध्ये आहे. या नोटमधील सविस्तर मजकुराबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही.
माहितीनुसार आमदार यादव हे बाहेरगावी होते. तर त्यांची पत्नी सीमा यादव या भोपाळला काही कामानिमित्त गेल्या होत्या. मोठा मुलगा समर्थ यादव या सिवनी टाला स्थित पेट्रोल पंपावर गेला होता. विभोरने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.