MUMBAI CRIME SHOCKER: GIRLS KIDNAPPING CASES RISE ALARMINGLY
Mumbai Crime

Mumbai Crime: मुंबईत मुलींच्या अपहरणाचं प्रमाण वाढलं, दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून बेपत्ता

Missing Girls: मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबईत सतत धावणाऱ्या मायनगरीत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण गतावधीक वाढत असल्याचे पोलिस दप्तरी दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत मुंबई पोलिसांच्या दप्तरात ११८७ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे नोंद झाले असून, त्यापैकी १११८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. उरलेल्या प्रकरणांचा तपास सुरू आहे. आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

MUMBAI CRIME SHOCKER: GIRLS KIDNAPPING CASES RISE ALARMINGLY
lionel messi: मेस्सींच्या लवकर निघून जाण्याने कोलकात्यातील स्टेडियममध्ये चाहत्यांचा गोंधळ; खुर्च्या तोडल्या, बाटल्या फेकल्या अन्...

विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात एकट्यात १३६ अपहरणाचे गुन्हे नोंद झाले, ज्यातील १०२ गुन्ह्यांचा उलगडा पोलिसांनी केला. आकडेवारीनुसार मुंबईत दररोज सरासरी चार ते पाच अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत. जानेवारी महिन्यात १२६ गुन्हे नोंद झाले असताना मार्च, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये हा आकडा १३६ च्या वर गेला. नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंतही गुन्ह्यांची संख्या शंभरी ओलांडली आहे.

MUMBAI CRIME SHOCKER: GIRLS KIDNAPPING CASES RISE ALARMINGLY
Kandivali Crime: कांदिवली लैंगिक अत्याचार प्रकरणात मनसेनंतर भाजपचीही आक्रमक भूमिका

एकूण महिलांसंबंधित ५८८६ गुन्ह्यांमध्ये १०२५ बलात्काराचे प्रकरणे आहेत, ज्यात अल्पवयीन मुलींसंबंधित ५२६ गुन्ह्यांचा समावेश आहे. या ५८८६ पैकी ५५६१ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या वाढत्या गुन्ह्यांमुळे मुंबई पोलिसांना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली असून, मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी वाढत आहे.

Summary
  • गेल्या दहा महिन्यांत १,१८७ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे नोंद

  • दिवसाला सरासरी चार ते पाच मुली मुंबईतून बेपत्ता

  • महिलांवरील एकूण ५,८८६ गुन्हे मुंबई पोलिसांकडे दाखल

  • ऑक्टोबरमध्ये अपहरणाचे सर्वाधिक १३६ गुन्हे नोंद

  • मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com