Mumbai crime | उलटीची तस्करी; बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक

Mumbai crime | उलटीची तस्करी; बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक

Published by :
Published on

उलटी हा शब्द एकला तरी आपल्याला किळस येते मात्र याच उलटीची करोडो रुपायांना तस्करी होताना कधी एकले नसेल. पण या उलटीची करोडो रुपयांना तस्करी करताना मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हि उलटी माणसाची नसून देवमाशाची आहे. व्हेल फिश म्हणून जगात ओळख असलेल्या देवमाशाने उलटी केल्यावर जी विष्ठा बाहेर पडते ती विष्ठा कालांतराने दगडात रुपांतर होईन नंतर तो भाग माऊ दगडात बदलुन किणाऱ्यावर येते. याचा वास अतीउग्र असतो व काही दिवसात सुगंधी द्रव्यासारखा वास येउ लागतो. जितका जुना दगड असतो तितका वास अधिक चांगला येतो म्हणून याता वापर सुगंधी द्रव्ये,अत्तर यांनसाठी होतो. या उलटीची मागणी आंतराष्ट्रीय बाजारात करोडो रुपयांना आहे मात्र भारतात या गोष्टीला विकण्याची परवानगी नाही. असे केल्याल गुन्हा ठरु शकतो.

देवमाशाच्या ७ कोटी ७५ लाख रुपये किमतीची उलटीची तस्करी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या लोअर परेल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली. अँबरग्रीस हा व्हेल माशाच्या उलटीचा पदार्थ लोवर परेल परिसरातल्या सीताराम मिल कंंम्पाउंड परिसरात तस्करीसाठी आणण्यात आला होता.या दोन्ही आरोपींपैकी एक आरोपी हा मुंबई पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी आहे. हे लोक हा पदार्थ कोणाला विकणार होते आणि तो कोठून आणण्यात आला होता याबद्दलचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलंय.

गुन्हे शाखेच्या सोपान काकडे, प्रभारी पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ३ ह्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com